
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक व पिंप्री सदो येथे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉ बाबाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून १० लाखांच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न झाले. आमदार हिरामण खोसकर यांचे पुतणे भास्करराव खोसकर यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. या दोन्ही गावांना सहा महिन्यांच्या कालावधीत सामाजिक सभागृह होणार असल्याने नागरिकानी आमदार खोसकर यांचे आभार मानले. यावेळी शेणवड बुद्रुकच्या सरपंच कलावती जयराम खडके, उपसरपंच कैलास कडू, सदस्य योगेश्वर गिळंदे, बबन खडके, संजय खडके, संगीता गिळंदे, शशिकला गिळंदे, सखुबाई शिंदे, गीता खडके, शेवंता खडके, पिंप्री सदोचे सामाजिक कार्यकर्ते जगन कदम, ग्रामसेवक गुलाब साळवे, कंत्राटदार प्रभू अ. भडांगे, स्वीय सहाय्यक खंडू परदेशी, सचिन तारगे, मिलिंद शिंदे, कोंडाजी गिळंदे, पुंडलिक गिळंदे, ईश्वर शिंदे, चिंधु वाह्याळ, प्रशांत शिंदे, संदीप शिंदे, गौरव मुकणे, विष्णू शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.