
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २४– सिंहासनाधीश्वर…योगीराज… श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ! अशा अनेकानेक घोषणा देत मुकणे येथे शिवजयंतीनिमित्त चार दिवस अभूतपूर्व उत्साह संचारला होता. एव्हढेच नव्हे तर गावातील युवक दर महिन्याच्या १९ तारखेला कावनई येथील कपिलधारा तीर्थ आणुन महाराजांचा अभिषेक आणि आरती करतात. अनेक ठिकाणी डिजेच्या तालावर थिरकत महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात. येथील युवकांनी समस्त युवा वर्गाला आदर्शवत अशी शिवजयंती साजरी करत नवा आदर्श निर्माण केला आहे. केवळ पैसे खर्चूनच नव्हे तर स्वतः हिरीरीने सहभागी होऊन चार दिवस आनंदमय वातावरण आणि अभूतपुर्व उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा यावर्षी पार पडला.
रोज ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने होणाऱ्या कार्यक्रमांनी अवघे वातावरण शिवमय झाले होते. शिवजन्मोत्सव सोहळा सुरु करताना प्रथम श्रीक्षेत्र कपिलधारा तीर्थ कावनई येथुन कपिलधारा तिर्थ आणुन पहाटे ५ वाजता महाराजांच्या मुर्तीला अभिषेक करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभुतपूर्व उत्साहात कार्यक्रमाला सुरुवात झाली. गावातुन टाळ मृदुंगाच्या गजरात लहान मुले आणि मुलींनी भगवे वस्त्र परिधान करून नृत्याच्या तालावर शिवरायांची पालखीतुन मिरवणुक काढुन एक वेगळा आदर्श युवकांनी घालुन दिला. महाराजांच्या चरित्राचे विश्लेषण नांदुरवैद्य येथील मनोहर महाराज सायखेडे यांनी चार दिवसीय शिवचरित्र व्याख्यान व पारायण सोहळ्यातून केले. महाराजांचा जीवनपट उलगडणारे चार दिवसीय शिवचरित्र व्याख्यान सादर करुन खरी शिवजयंती मुकणे येथे साजरी झाली. कार्यक्रमात शिवाजी महाराजांसह अनेक पात्र येथील युवकांनी पात्राला साजेशी वेशभुषा करुन सादर केले. वातावरण आनंदमय झाले होते. लहान मुले व महिलाही या शिवजन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमासाठी शिवगर्जना मित्र मंडळाचे समाधान राव, बापु राव, तुषार राव, वैभव राव, सागर शिंदे, आशिष राव, दिपक राव, दिनेश राव, मिनीनाथ गुळवे, गोकुळ राव, त्र्यंबक आवारी, राहुल नाठे, राहुल राव, पप्पु नरवटे, अंकुश खांदवे, सुनिल आवारी, दिपक आवारी, अरुण राव, गणेश बोराडे, दिनेश बोराडे, गणेश शिंदे, सरपंच हिरामण राव, दिलीप राव, अशोक राव, देविदास राव, विनोद रहाडे, चेतन शिंदे, सागर शिंदे, महेश राव, संदिप रहाडे, चेतन वेल्हाळ, रामनाथ राव, निलेश राव, विकास राव, सचिन राव, अमोल आंबेकर, चेतन बोराडे, गणेश राव, निवृत्ती राव, रवींद्र राव आदींसह मुकणे गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान राव यांनी केले.
