कुऱ्हेगाव जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : उत्तम आयोजनाबद्धल ग्रामस्थांनी शिक्षकांचे केले कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – कुऱ्हेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष निवृत्ती नाठे यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी इगतपुरी तालुका शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सचिन कापडणीस, जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र दाभाडे, कैलास शिंदे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नृत्य, नाट्य कला यातून आपले सुंदर कलाविष्कार सादर केले. सायंकाळच्या वेळेला प्रथमच स्नेहसंमेलन झाल्याने संपूर्ण गावांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. संपूर्ण कुऱ्हेगाव ग्रामस्थ या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित होते.

मुख्याध्यापक जगन्नाथ बिरारी, छाया जाधव, कलाशिक्षक सुनिल शिंदे, नृत्यदिग्दर्शक राहुल सहाणे यांनी उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांकडून कलाविष्काराची तयारी करून घेतल्याने कार्यक्रम अतिशय सुंदर असा संपन्न झाला. म्हणून गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस पाटील ज्ञानेश्वर धोंगडे, शिवराम धोंगडे, शरद धोंगडे  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास धोंगडे, शिक्षणप्रेमी सदस्य प्रवीण धोंगडे, उपाध्यक्ष समाधान धोंगडे, शंकर धोंगडे, संतोष पवार, शिवराम पवार, विष्णू धोंगडे, संपत तांबे, गणेश धोंगडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष धोंगडे, जयराम गव्हाणे उपस्थित होते. मुख्याध्यापक जगन्नाथ बिरारी यांची बदली झाल्याने गावकऱ्यांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नांदूरवैद्य शाळेचे मुख्याध्यापक बोराडे सर यांनी केले.

Similar Posts

error: Content is protected !!