इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे वितरण आज रंगशारदा सभागृह बांद्रा, मुंबई येथे करण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील टिटोली जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सिध्दार्थ सोमा सपकाळे यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक गटातून १, आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक शिक्षक गटातुन २, माध्यमिक शिक्षक गटातून १ शिक्षकाचाही सन्मान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, १ लाखांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, शिक्षण सचिव रणजितसिंग देओल, संचालक कृष्णकुमार पाटील ऑनलाईन उपस्थित होते. राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, अनिल बागुल, कैलास बोढारे, सचिन गायकवाड आदी शिक्षक बांधव कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने हजर होते. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार निर्मला गावित, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, टिटोलीचे सरपंच खादी ग्रामोद्योगचे व्हॉइस चेअरमन अनिल भोपे, शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सिद्धार्थ सपकाळे यांचे अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group