
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ – स्वदेश फाउंडेशन ही सेवाभावी संस्था नेहमीच आणि सतत सर्वासामान्य आणि आदिवासी जनतेच्या हितासाठी कार्य करत असते. या संस्थेने पिंपळगाव भटाटा, गांगडवाडी, देवीचीवाडी, शिंदेवाडी येथे सामाजिक काम केले आहे. येथील गरजू लाभार्थ्यांकडून नाममात्र लोकवर्गणी घेऊन ४४ लाभार्थ्यांना धरणातून मासेमारीसाठी फिशिंग नेटचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वदेश फाउंडेशनचे फिल्ड ऑफिसर सुधीर चव्हाण, habitat संस्थेचे फिल्ड ऑफिसर आझाद जमादार, सरपंच बळवंत हिंदोळे, देविदास हिंदोळे, नावजी हिंदोळे, लक्ष्मण हिंदोळे, मधुकर हिंदोळे, योगेश्वर हिंदोळे, वसंत रेरे, दशरथ बुंधेले इत्यादी लाभार्थी उपस्थित होते. फिशिंग नेटचा वापर काळजीपूर्वक करावा. स्वतःच्या कुटुंबासाठी आणि उपजीविकेसाठी वापर करून उदरनिर्वाह करावा. काळजीपूर्वक वापर करून उत्पन्न वाढवावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.