
इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ – एसएमबीटी आयुर्वेदिक महाविद्यालय धामणगाव, राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रामपंचायत बेलगाव तऱ्हाळे यांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबीर १३ ते १७ फेब्रुवारीपर्यंत बेलगाव तऱ्हाळे येथे होत आहे. यामध्ये बालके, मुले मुली, महिला, पुरुष यांची आरोग्य तपासणी, मार्गदर्शन, उपचार केले जाणार आहे. प्राचार्य प्रदीप भाबड यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराला सुरुवात केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ममाजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी भूषवले. सरपंच अशोक मोरे, उपसरपंच संतोष मोरे, रासेयो डॉ. साक्षी वाघमारे, अनघा कुलकर्णी, डॉ. हर्ष पगारे, डॉ. गौरव राजपूत, ग्रामपंचायत सदस्य योगेश तातळे, सुवर्णा आव्हाड, प्रमिला वारुंगसे, सुशीला तातळे, बबाबाई मोरे, ग्रामसेवक गोपाल चौधरी, अशोक आव्हाड, चंद्रकांत बेलगांवकर, मुख्याध्यापक सांगळे, मुख्याध्यापक प्रदीप ढेंगळे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य प्रदीप भाबड म्हणाले की प्रत्येकाने आपल्या जीवनात सर्वप्रथम आरोग्याला महत्व द्यावे. वेळोवेळी आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन घेऊन उपचार घेतले पाहिजे. माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, संतोष वारुंगसे यांनीही मनोगत व्यक्त केले. राजाराम इदे यांनी सूत्रसंचालन केले