कवितांचा मळा – कुणीतरी हवं असतं….!

कु. सोनाली कोसे, चंद्रपूर, 9322482768

मनातील ओझं कमी करण्यास
कुणीतरी हवं असतं…
सुख दुःखात भागीदार
बळ देण्यास कुणीतरी हवं असतं…

मनातील स्वार्थी वृत्ती
सारून प्रत्येकानी बाजूला
घमंडीपणा, मी पणा
नकोत भेदाभेद नात्याला

चूकभूल झाल्यास समजवायला
कुणीतरी हवं असतं…
रक्ताची नाती म्हणुनी जपायला
कुणीतरी हवं असतं…

आधाराची काठी म्हणुनी
सोबत चालायला कुणीतरी हवं असतं…
काटेरी वळणावर फुल बनणारं
कुणीतरी हवं असतं…

डोळ्यांतील अश्रू पुसायला
कुणीतरी हवं असतं…
सार सत्याचे सांगण्यास
कुणीतरी हवं असतं…

एकांतात गुदमरताना
सावराया कुणीतरी हवं असतं…
सहारा बनून आजन्म ऋणी असण्यास कुणीतरी हवं असतं…

error: Content is protected !!