
– कु. सोनाली कोसे, चंद्रपूर, 9322482768
मुके बोल गुंजते मुखी
न कळताच नजर भिडते
स्पंदने हृदयाची धडधडत
हा जीव प्रेमवेडा बनते
हळूहळू स्पर्श प्रेमाचा
वाटतो सर्वांस हवाहवासा
एकमेकांत जीव ओतून
भान हरवून जाते जसा
लागण त्या प्रियकराची
सोसवेना मग दुरावा
वासनेच्या आहारी जाऊन
देतो खोट्या प्रेमाचा दावा
समोर काही दिवसानंतर
शंका, निःशंका येतेच मनी
वाद करूनी रुसणं, फुगणं
घेतो स्वतःलाच त्रास करूनी
असच चाललंय आजकाल
वाढते प्रमाण धोक्याचे
प्रेम, स्पर्श आणि वासना
खेळ खेळतो लपंडावाचे