मुकणे धरणग्रस्तांना नाशिक मनपामध्ये आरक्षण मिळण्याच्या हालचाली गतिमान : आमदार हिरामण खोसकर, गोरख बोडके यांची अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ – नाशिक मनपातील नोकरभरतीची चर्चा सुरू झाल्यापासून मुकणे धरणग्रस्तांना नोकरभरतीत आरक्षण मिळावे या मागणीच्या अनुषंगाने इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्यासह तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आज नाशिक मनपाचे उपायुक्त मनोज घोडे यांच्या दालनात आमदार हिरामण खोसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, युवक काँग्रेसचे भास्कर गुंजाळ आदींची बैठक झाली. बैठकीला धरणग्रस्तांचे प्रतिनिधी भास्कर खातळे, मुकणेचे सरपंच हिरामण राव, ॲड. कैलास शिरसाठ, रंगनाथ खातळे, गोकुळ राव आदी हजर होते. मुकणे धरणग्रस्तांच्या विषयावर तब्बल तासभर चर्चा होऊन शैक्षणिक अहर्तेनुसार आपण मुकणे धरणग्रस्तांना भरतीत समाविष्ट करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. आमदार खोसकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबत येत्या दोन दिवसात बैठक घेऊन या विषयावर धरणग्रस्तांच्या आरक्षणासाठी परवानगी मिळवू असे आश्वासन दिले. धरणग्रस्तांसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा घडवून आणल्याने धरणग्रस्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!