एसएमबीटी रुग्णालय अथवा साकुर फाटा भागात जाणाऱ्या वाहनधारकांनो… इकडे लक्ष द्या : अस्वलीचे रेल्वे गेट उद्यापासून २ दिवस राहणार बंद

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या अस्वली स्टेशन येथील रेल्वेचे गेट उद्या दि. २६ ऑगस्टला सकाळी १० वाजेपासून दुरुस्तीच्या कामासाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. शनिवार दि. २७ ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता दुरुस्तीच्या कामानंतर हे गेट वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी ह्याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

दारणा धरण परिसर, एसएमबीटी रुग्णालय, सिन्नर, शिर्डी, जानोरी, मुंढेगाव आदी अनेक महत्वाच्या गावांना जोडणारे अस्वली स्टेशन येथील रेल्वेचे गेट आहे. विविध प्रकारची दुरुस्ती करण्यासाठी उद्या दि. 26 ते 27 ऑगस्टला हे गेट पूर्णपणे बंद असणार आहे. या दुरुस्तीच्या निमित्ताने गेटच्या अंतर्गत भागातील उंच सखल दगडे, खड्डे आणि दोन्ही बाजूच्या बाहेरील रस्त्यांची सुद्धा दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. ह्या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गाने प्रवास करावा असे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!