इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ ( किशोर देहाडे यांच्याकडून )
शासनाने भयानक संसर्ग थांबवण्यासाठी जनतेचा एकमेकांशी संपर्क टाळण्यासाठी ब्रेक द चेन ही संकल्पना अंमलात आणली. त्यासाठी संपूर्ण राज्यात काही नियम व अटी ठेऊन दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी लागू करण्यात आली. परंतु नागरिक नियमांना पायदळी तुडवतांना दिसत आहेत. इगतपुरी शहरातील नागरिक गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून नियमांना पायदळी तुडवत आहेत. सर्रासपणे भर बाजारात फेरफटका मारताना दिसत आहेत. विविध प्रकारच्या दुकानात गर्दी करतांना दिसत आहे. त्याच प्रमाणे मोटरसायकलस्वार कारण नसताना बाजारात वावरताना दिसतात. त्यात अल्पवयीन चालकांचाही समावेश मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. इगतपुरीतील नगरपालिका प्रशासन काय करीत आहे असा सवाल उपस्थित झाला आहे. मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना का आळा घालत नाहीत हा मोठा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.
या गंभीर परिस्थितीची पाहणी करून संबंधित प्रतिनिधीने केली. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना आज दुपारी बाजारात माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी मी पोलीस निरीक्षकांशी बोलते असे बोलून कॅमे-या समोर बोलण्यास नकार दिला. यामुळे प्रशासनाला भयंकर संकटाचे गांभीर्य नसल्याचे शहरभर बोलले जात आहे.
Similar Posts
Leave a Reply
You must be logged in to post a comment.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group