कोरोना लढ्यासाठी भावलीला ग्रामपंचायतीची “सावली” ; भावलीत कोरोना लसीकरणाचा ग्रामस्थांत “उल्हास”

इगतपुरीनामा न्यूज, दि. 17
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील भावली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत कोरोना संसर्ग रोखवण्यासाठी ग्रामपंचायतीने सर्वोत्तम उपाययोजना केल्या आहेत. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उल्हास कोळी यांच्या नियोजन कौशल्यातून सरपंच जिजाबाई आगीवले, उपसरपंच दौलत भगत, पोलीस पाटील जगन्नाथ आगीवले, प्राथमिक शिक्षक, आरोग्य अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी चोख व्यवस्थापन केल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. इगतपुरीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांनी भावलीच्या सर्व कोविड योद्धयांचे कौतुक केले आहे. दरम्यान आज कोरोना लसीकरणाला ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला. उर्वरित ग्रामस्थांचे लवकरच लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गेल्यावर्षी कोरोना महामारी आल्यापासून सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. आपल्या गावापर्यंत अथवा घरापर्यंत ही महामारी येऊ नये म्हणून प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. यानुसार भावली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील भावली, तांबडमाळ, धामडकी, धारवाडी ह्या आदिवासी वाड्या पाड्यांची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायत सदैव अग्रस्थानी आहे. गेल्या वर्षांपासून ग्रामपंचायतीने उपकेंद्राला औषधे, सॅनिटायझर, साबण, उपकेंद्र आणि शाळांना थर्मोमिटर, ऑक्सिमीटर, मास्क वाटप केले. त्यामुळे शिक्षक, आशा, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना तपासणी आणि सर्वेक्षण कामाला उपयोग झाला. संपूर्ण गावात धुरळणी फवारण्याचे काम, दवंडी देऊन जागृती करण्यात आली. विविध उपक्रम प्राधान्याने राबवल्याने ग्रामस्थ सुरक्षित राहू शकले. इगतपुरीच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार भावली गावात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. ग्रामपंचायतीचे मोठे कार्यक्षेत्र, परगावच्या पर्यटकांची रेलचेल, गेल्या वर्षीचे एकलव्य कोविड सेंटर, भावली धरण आदींमुळे गावाला सुरक्षित ठेवण्याचे आव्हान ग्रामपंचायतीने उत्तम पार पाडले.
ग्रामसेवक उल्हास कोळी यांच्या नियोजनातून सरपंच जिजाबाई आगीवले,  उपसरपंच दौलत भगत, कर्मचारी चंद्रकांत आगीवले, नितीन सोनवणे, पोलीस पाटील जगन्नाथ आगीवले, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ आगीवले, योगेश आगीवले, यशवंत झुगरे, दुर्गाबाई आगीवले, मथुराबाई तेलम, भिमाबाई तेलम, रेणुका तेलम, चांगुणा तेलम आदींसह ग्रामस्थांचा सहयोग कोरोना रोखण्यासाठी मोलाचा ठरतोय.
आज वैद्यकीय अधिकारी डॉ. रागिणी गांगुर्डे, ग्रामसेवक उल्हास कोळी, उपसरपंच दौलत भगत, आरोग्य सेवक  बिपीन नेवासकर यांच्या समन्वयाने कोरोना लसीकरण कार्यक्रम उत्साहात राबवण्यात आला. ग्रामस्थांनी लसीकरणाला उदंड प्रतिसाद दिला. आरोग्य सहाय्यक पुरुषोत्तम वाणी, नयना वाघ, कोमल ब्राम्हणे, आरोग्य सेविका सरला सोनवणे, सिंधू नरवडे, चारुशीला गोसावी, ज्योती मरकड, कैलास मते, गटप्रवर्तक शबनम पटेल, आशा कार्यकर्ती हिरा झुगरे, ललिता दरवडे, धोंडीबाई आगीवले, भिमाबाई तेलम, प्रमोद परदेशी, संजय बोरसे, विश्वनाथ डहाळे, कल्पना आहेर, सुनिल सांगळे, प्रशांत देवरे, योगेश घाडीगावकर, पांडुरंग अहिरे, कमलाकर नेमाडे, योगेश कांबळे, मनिषा पाटील, लीना धोंडकर आदींनी लसीकरण यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!