इगतपुरीनामा न्यूज, दि. 17
इगतपुरी तालुक्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत असून आज 40 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. ह्यामुळे दिलासादायक वातावरण निर्माण होत आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत 38 व्यक्तींना कोरोना झाल्याचे निदान करण्यात आले तर आतापर्यंत 272 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ह्या रोगाचे कोणतेही लक्षण आढळल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे. तालुक्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना उच्चाटन करण्यासाठी जीवाचे रान करीत आहे. नागरिकांनी सूचनांचे पालन करून योगदान देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
घोटी शहरातील विनाकारण फिरणाऱ्या लोकांविरोधात घोटी पोलिसांनी आज कारवाईचे सत्र उभारले. ह्यामुळे नागरिकांनी घोटी पोलिसांचे आभार मानले आहेत. दरम्यान इगतपुरी तालुक्यातील बऱ्याच लोकांकडून व्हॉटस अँप, फेसबुक आदी सोशल मीडियावर श्रद्धांजली, निधन, दशक्रिया आदी मेसेज टाकण्यात येतात. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरत आहे. अशा मेसेजवर बंदी करावी अशी मागणी जागरूक नागरिकांकडून होत आहे.
■ आज व उद्याच्या विकेंड बंद नंतर परवा एक दिवस इगतपुरी मार्केट सुरू होऊन पुढे एक आठवडा जनता कर्फ्यु लागणार आहे. लोकांनी सोमवारी मार्केटला सुरक्षित अंतर पाळूनच खरेदी करावी. सध्या 10 नॉर्मल माणसांमध्ये दोन तीन सायलेंट कॅरियर (ज्यांना काहीच लक्षणं नसतात ) असण्याची दाट शक्यता आहे. आपल्या परिवाराची काळजी असल्यास बाजारातील गर्दीतून कोरोना घरी नेऊ नका ही आग्रहाची विनंती.
– डॉ. प्रदीप बागल, होमिओपॅथीक तज्ञ, इगतपुरी
प्रभावी औषध बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक टॅबलेट
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7038394724