इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – स्वच्छ भारत अभियानांतर्गत अतिदुर्गम भागातील मानवेढे ग्रामपंचायतीकडून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीला अत्यंत अल्प उत्पन्न असूनही ग्रामपंचायत विविध महत्वाचे उपक्रम राबवत असल्याबद्धल ग्रामस्थांनी आनंद व्यक्ती केला. पर्यावरण पुरक व प्रदूषण मुक्त ई रिक्षा घंटागाडी आज लोकार्पण करण्यात आली. मानवेढे गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आजपासून संकल्प केला आहे. आगामी काळात आपल्या गावाचा चेहरामोहरा बदलून इगतपुरी तालुक्यातील अव्वल कामगिरी करणारे गाव म्हणून प्रसिद्ध होऊ असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. इगतपुरी तालुक्यात प्रथमच स्वच्छ भारत अभियानात मानवेढे गाव सहभागी होत आहे. इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी यानिमित्त शुभेच्छा पाठवल्या आहेत. लोकार्पण कार्यक्रमावेळी सरपंच मनोहर संतू वीर, उपसरपंच भाऊराव ज्ञानेश्वर भागडे, माजी सरपंच फुलचंद वीर, शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष रतन काळु भागडे, ग्रामपंचायत सदस्या वत्सला भागडे, मुख्याध्यापक मेमाने सर, आरोग्यसेविका चारू गोसावी, खैरनार सर, सोनवणे सर, पाटील सर, ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group