इगतपुरी तालुक्यात 43 रुग्ण वाढले ; 372 जणांवर उपचार सुरू

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
गेल्या वर्षीच्या कोरोना उद्रेकात धोक्यापासून दूर राहिलेला इगतपुरी तालुका ह्यावर्षीच्या कोरोना उद्रेकात सापडला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या वाढतच असल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत इगतपुरी तालुक्यात 43 एवढी कोरोना रुग्णांची संख्या वाढली. आता उपचार सुरू असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 372 एवढी झाली आहे. कोरपगाव येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू असून आरोग्य यंत्रणा सर्वोतोपरी काळजी घेत आहे. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडण्याचा धोका असूनही तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी केली जात आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा बहुतांशी वाढल्याचे दिसते. आगामी काळात नागरिकांनी सूचनांचे पालन न केल्यास इगतपुरी तालुक्यात उपचार करणेही अवघड होऊन बसेल, हा धोका टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरावे. घराबाहेर पडू नये. रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे घ्यावी. व्यायाम करावे असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. विकेंड लॉकडाऊनला इगतपुरी तालुक्यात उत्तम प्रतिसाद लाभला. सर्व यंत्रणांनी याबाबत केलेले नियोजन यशस्वी झाले.

बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!