
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – टिटोली जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. शाळा व्यवस्थापन समिती सदस्या निर्मला चव्हाण यांनी ध्वजारोहण केले. यावेळी विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. जय जवान जय किसानचा प्रेरणास्तंभ संग्राम सोशल ग्रुपतर्फे शाळेलगत एक सेल्फी पॉईंट म्हणून उभारण्यात आला. देशासाठी लढणाऱ्या जवानांना केवळ एक दिवसापुरते स्मरणात न ठेवता दररोज त्यांना वंदन व्हावे. देशाचे खरे मालक म्हणजे शेतकरी यांना स्मरूण एक प्रगतीशील शेतकरी निर्माण व्हावा असे मत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उपसरपंच अनिल भोपे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक पांडुरंग भडांगे यांनी शाळेसाठी तीस हजारांचा धनादेश मुख्याध्यापक तथा शालेय व्यवस्थापन समितीकडे सुपुर्द केला. सामाजिक कार्यकर्ते गणेश भटाटे यांनी १ ते ७ वी च्या विद्यार्थ्यासाठी खेळाचे साहित्य भेट दिले. मंगलदास बोंडे, साईराज बोंडे, जयराज बोंडे यांनी विद्यार्थ्यांसाठी चॉकलेट तथा इतर खाऊ वाटप केले. मुख्याध्यापिका मंगला शार्दुल यांनी ऐ मेरे वतन के लोगो हे गीत आपल्या सुमधुर आवाजात सादर केले. शालेच्या विद्यार्थ्याचे रेडीओ विश्वास या आकाशवानी केंद्रावर आजच्या प्रजासत्ताक दिनी दिलेले मनोगत भाषणातुन, कवितेतुन प्रसारीत करण्यात आले. सरपंच काजल गभाले, सदस्य माया भडांगे, ज्योती बोंडे, नाजुका बोंडे, पोलीस पाटील कोंडाजी बोंडे, सामाजिक कार्यकर्ते संदिप भडांगे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तानाजी हाडप, मंगलदास बोंडे, भरत हाडप, बन्सी शिंगोळे, रूख्मिणी भटाटे, श्री संग्राम सोशल ग्रुप, ज्येष्ठ नागरीक, सर्व बचत गट, आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ता, पालक, शिक्षक उपस्थित होते.
