गोरख बोडके यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे मोडाळेसारख्या दुर्गम गावात जिओ टॉवर कार्यान्वित – जिओ महाराष्ट्र हेड राजेश नायक : जिओ टॉवरमुळे अतिदुर्गम भागातील गावे आली संपर्क कक्षेत

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – खेडे विकसित करण्यासाठी जीवापाड आणि अखंडित प्रयत्न केल्यास खऱ्या अर्थाने गावकऱ्यांना विकासाची फळे चाखता येतात. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या अखंड प्रयत्नांमुळे इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ह्या गावात जिओ कंपनीने टॉवर बसवला आहे. मोडाळे गाव हे दोन डोंगराच्या मध्यभागी असल्यामुळे कुशेगाव, सांजेगाव येथील जिओचे दोन्ही टॉवर असूनही नेटवर्क मिळत नव्हते. एकमेव गावासाठी जिओ टॉवरचा खर्च करणे कंपनीला अशक्य होते. मात्र गोरख बोडके यांनी याप्रकरणी सातत्याने केलेला पाठपुरावा, जिद्ध आणि चिकाटी यामुळे अखेर आज जिओ टॉवर कार्यान्वित झाला असे कौतुक जिओ कंपनीचे महाराष्ट्र हेड राजेश नायक यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील जिओ टॉवरच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी जिओ कंपनी आणि अधिकाऱ्यांचे गावकऱ्यांतर्फे ऋण व्यक्त केले. माझ्या जनतेसाठी मी सतत प्रयत्नशील राहून विकासाचा मार्ग अजून सोपा करील असे ते शेवटी म्हणाले.

विकासाची दमदार वाटचाल करणाऱ्या मोडाळे येथे उच्च क्षमतेचा मोबाईल टॉवर सुरु झाल्याबद्धल जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांचे गावकऱ्यांनी आभार मानले. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी यापूर्वी स्वतः दखल घेत विशेष बाब म्हणून मोबाईल टॉवर मंजूर केला आहे. कुशेगाव आणि सांजेगाव ह्या २ गावांमध्ये मोबाईलचे २ टॉवर आहेत. मात्र मधल्या भागात डोंगर येत असल्याने मोबाईलचे नेटवर्क मोडाळे गावकऱ्यांना मिळत नव्हते. नव्या टॉवरमुळे स्पर्धा परीक्षा अभ्यासार्थी, युवक, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांना मोठा फायदा होणार आहे. यासह ह्या भागातील अनेक दुर्गम आदिवासी वाड्या मोबाईल नेटवर्कमुळे संपर्क क्षेत्रात आल्या आहेत. गोरख बोडके यांच्यामुळे आता मोडाळे गाव आणि परिसर नेटवर्कच्या कक्षेत आले आहेत. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी ग्रामस्थांतर्फे उद्योगपती मुकेश अंबानी, जिओ कंपनीचे महाराष्ट्र हेड राजेश नायक, महाराष्ट्र सेल्स हेड चंद्रभान परियर, जिल्हा हेड संदीप पाटील, जनसंपर्क अधिकारी प्रशांत जैन यांचे आभार मानले. यावेळी गावचे सरपंच उपसरपंच सदस्य व गांवकरी हजर होते

Similar Posts

error: Content is protected !!