टिटोली ग्रामपंचायतीतर्फे २५ कुटुंबांना गॅस शेगड्यांचे वाटप : स्वातंत्र्यदिनानिमित्त उपक्रमाचे महिलांकडून कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

टिटोली येथील २५ कुटुंबांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तीन बर्नलच्या आयएसआय प्रमाणित गॅस शेगड्यांचे वाटप करण्यात आले. उपसरपंच अनिल भोपे ह्यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाच्या १५ टक्के निधीतुन २५ मागासवर्गीय कुटुंबांना गॅस शेगड्या वाटप केल्या. महिलांना चुलीच्या धुराचा त्रास होऊ नये यासाठी मोफत गॅस शेगडी देण्याचे धोरण टिटोली ग्रामपंचायतीने अंमलात आणले असे गावचे उपसरपंच अनिल भोपे म्हणाले. सरपंच काजल गभाले, उपसरपंच अनिल भोपे, ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी गभाले, माया भडांगे, ज्योती बोंडे, कोमल हाडप, ग्रामसेविका स्वाती गोसावी, कर्मचारी गणेश बोंडे, प्रवीण भटाटे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत गॅस शेगड्यांचे वाटप करण्यात आले. ह्याकामी भरत हाडप ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!