
इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ – घोटी शहरातील आगरी गल्ली येथील युवकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. युवकाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आत्महत्येचे कारण मात्र समजले नसून घोटी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. संतोष म्हसणे वय ३५ असे युवकाचे नाव आहे. घोटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.