इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
सांजेगाव ग्रामपंचायत, आणि नाशिकचे डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. मविप्रचे संचालक भाऊसाहेब खातळे यांचे प्रमुख उपस्थितीत हे शिबीर राबवण्यात आले. जनआरोग्य शिबीरात ९७१ आजार व १२१ पाठपुरावा सेवांवर मोफत उपचार मिळणार आहेत. यात जवळ जवळ सर्व प्रकारच्या दुर्धर शस्त्रक्रिया, एन्जोप्लास्टी, डायलिसिस यासारखे सर्व प्रकारचे आजार, अपघात यावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. उपचारासाठी पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे भाऊसाहेब खातळे यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी सांजेगावच्या सरपंच नीता गोवर्धने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. चितळे, राजू गोवर्धने, रोहिदास गोवर्धने, प्रतीक गोवर्धने, रमेश गोवर्धने, विष्णू गोवर्धने, देविदास गोवर्धने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.