
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – अंधेरी मुंबई येथील वेदांत तायक्वांदो अकॅडमीतर्फे ग्रीन १, यलो, ब्लू, रेड बेल्टचे वितरण करण्यात आले. न्यूज सेव्हन मराठीचे संचालक पत्रकार राजु देवळेकर यांच्या हस्ते बेल्ट वितरण करण्यात आले. मुंबई भायखळा आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ हायस्कूल मधील विद्यार्थिनींना प्रशिक्षणानंतर बेल्टचे सन्मानपूर्वक वितरण संपन्न झाले. वेदांत तायक्वांदो अकॅडमीचे संस्थापक तथा प्रशिक्षक रोहिदास शिर्के गेल्या १५ वर्षापासून ह्या शाळेत विद्यार्थिनींना प्रशिक्षणाचे धडे देत आहेत. कार्यक्रमाप्रसंगी लालबाग फ्रेंड सर्कलचे सचिन धाडीगावकर, अल्पेश सावंत, मंगेश साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार राजू देवळेकर यांनी गुणवंत विद्यार्थिनींना यावेळी शुभेच्छा दिल्या.