खादी ग्रामोद्योग संघाच्या सर्वच्या सर्व ११ जागा बिनविरोध : संचालकपदी पत्रकार भास्कर सोनवणे, अनिल भोपे, भगीरथ भगत आदींची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ – इगतपुरी तालुका खादी ग्रामोद्योग संघाची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली आहे. इगतपुरीनामाचे संपादक पत्रकार भास्कर सोनवणे, टिटोलीचे सरपंच तथा आगरी समाजाचे नेते अनिल भोपे, माजी संचालक भगीरथ भगत यांची संचालकपदी बिनविरोध वर्णी लागली आहे. त्यांच्या निवडीबद्धल इगतपुरी तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. सभासदांच्या शाश्वत हितासाठी चांगले काम करू अशी प्रतिक्रिया नूतन संचालकांनी दिली. इगतपुरी तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक प्राधिकरणातर्फे इगतपुरीच्या सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था अर्चना सौंदाणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

आज माघारीच्या अखेरच्या दिवशी संस्थेच्या संचालकपदासाठी असणाऱ्या संपूर्ण ११ जागा बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. मावळते चेअरमन बाळासाहेब वालझाडे, इगतपुरीनामाचे संपादक पत्रकार भास्कर सोनवणे, टिटोलीचे सरपंच तथा आगरी समाजाचे नेते अनिल भोपे, माजी संचालक भगीरथ भगत, शिवाजी शिंदे, सुनिता क्षिरसागर, माया किर्वे, ज्ञानेश्वर लहामगे, राजेंद्र बागुल, लहु तोकडे, सोमनाथ क्षिरसागर या सर्वांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली आहे. बिनविरोध निवडीसाठी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार निर्मला गावित, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्री संघांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, आगरी समाजाचे नेते अरुण भागडे, धनराज म्हसणे आदींनी विशेष प्रयत्न केले. शिंदे गट शिवसेना उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पोपट गवांदे, माणिकखांबचे सरपंच शाम चव्हाण, कैलास कडु, भरत रायकर, बाळा चव्हाण, कोंडाजी बोंडे, मंगेश बोंडे, भानुदास आडोळे, श्री संग्राम सोशल ग्रुपचे कार्यकर्ते आदींनी नवनिर्वाचित संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!