
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – इगतपुरी तालुक्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी वैतरणा धरणाजवळ मजुरांना घेऊन जाणारा टॅक्टर झाला आहे. ह्या अपघातात १० मजूर जखमी झाले असून सुदैवाने जीवित हानी टळली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणाजवळ कॅनॉलच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला व पुरुष मजुरांना हा ट्रॅक्टर घेऊन जात होता. हा कॅनॉल बंद असल्याने जीवितहानी टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. स्थानिक नागरिकांनी जखमी मजुरांना मदत करून उपचारासाठी वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.