इगतपुरी तालुक्यात आज सापडले इतके रुग्ण ; निर्बंधांचे उल्लंघन करून इगतपुरीत हॉटेलात विवाह सोहळा

इगतपुरीनामा न्युज, दि. ३०

तालुक्यातील कोरोनाची आकडेवारी दोन अंकांवर स्थिरावतांना दिसत असून तालुक्याच्या दृष्टीने सध्या तरी समाधानकारक वातावरण आहे. नव्या रुग्णांची आकडेवारी हळू हळू कमी होतांना दिसत असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोरोना बाधित आकडेवारी कदाचित 50 च्या आत येण्याची शक्यता आहे. आज आलेल्या अहवालानुसार तालुक्यात 10 नवीन कोरोना बाधित आढळून आले असून 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या तालुक्यात एकूण 86 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान गेले काही दिवस बाधितांची संख्या ही कोरोनामुक्तच्या संख्येपेक्षा जास्त येत असल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सध्या आकडेवारी स्थिर असल्याने तालुका वासीयांसाठी दिलासादायक वातावरण आहे. नुकत्याच आलेल्या नवीन निर्देशांमुळे बाजारपेठ पुन्हा काही वेळासाठी खुली झाली असल्याने रुग्णसंख्येची आकडेवारी वाढू नये यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी सांगितले

निर्बंधांचे उल्लंघन करून इगतपुरीत हॉटेलात विवाह सोहळा

( विकास काजळे यांच्याकडून ) : इगतपुरी येथील विवांत रिसॉर्ट येथे मोठ्या प्रमाणात विवाह सोहळा आज संपन्न झाला. या विवाह समारंभाला जवळपास 100 च्या वर वाहने येथे आली होती. तसेच कार्यक्रमात जवळपास 300 पेक्षा जास्त  लोकांची उपस्थिती असल्याचे समजतंय. तालुक्यात कोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत असताना प्रशासन डोळेझाक करताय की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा तसेच महाराष्ट्र सरकारने 1 तारखेपर्यंत जी नियमावली जाहीर केली होती त्यात संचारबंदी कायदा लागू असताना इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होतेच कशी असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामूळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेल्याचे स्पष्ट दिसतंय.

Advt : कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!