कठोर परिश्रम घेऊन इगतपुरीचा युवक झाला सनदी लेखापाल : श्री साई साहाय्य समितीकडून यशाचे कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० – इगतपुरी शहरातील जसपिंदरदीप सिंग जस्विर सिंग संघा याने सनदी लेखापाल परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या यशामुळे इगतपुरी तालुक्यात त्याचे कौतुक होत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील या २४ वर्षीय तरुणाने रोज १२ तास अभ्यास करून हे यश संपादन केले. या यशामागे आई वडिलांची प्रेरणा असल्याचे त्याने सांगितले.

जसपिंदरदीप सिंग याचे १० वी पर्यंत शिक्षण इगतपुरी शहरातील हॉली फॅमिली कॉन्व्हेन्ट या शाळेत झाले. तर १२ वी  वंडरलँड विद्यालयातून उत्तीर्ण झाला. पुढे बीवायके महाविद्यालयात बीबीए साठी प्रवेश घेत सीए होण्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. त्याच्या या यशानिमित्त श्री साई सहाय्य समितीतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू देवळेकर, संदीप कोतकर, सुमित बोधक, अभय पार्टे, गणेश घाटकर, गणेश बैरागी, प्रमोद डेंगळे, प्रवीण भटाटे, तनसिंग महाराज उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!