
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – इगतपुरी पंचायत समिती शिक्षण विभाग, इगतपुरी तालुका विज्ञान अध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने ४६ व्या इगतपुरी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन १० आणि ११ जानेवारीला वाडीवऱ्हे येथील माध्यमिक विद्यालयात करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण, समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, भगवान फुलारी, तहसीलदार परमेश्वर कासुळे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी अशोक मुंढे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी दुपारी ३ वाजता होणार आहे. यावेळी वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक भगवान फुलारी, ग्रामविकास अधिकारी किशोर दळवे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, पोलीस पाटील हिरामण कातोरे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, पोषण आहार अधीक्षक प्रतिभा बर्डे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष केशवराव आहेर, उपाध्यक्ष लालगीर गोसावी, कार्यवाहक देवेंद्र ठाकरे, मुख्याध्यापक बी. एल. वाघ, अण्णासाहेब सूर्यवंशी, सुरेखा खरे, आर. व्ही. कापडणीस, एम आर. शिंदे, पत्रकार के. टी. राजोळे, शरद मालुंजकर, भास्कर सोनवणे, विस्ताराधिकारी अशोक मुंढे, शिवाजी अहिरे, राजेश तायडे, कैलास सांगळे, राजेंद्र नेरे, केंद्रप्रमुख राजेंद्र नांदुरकर, एस. एन. सोनवणे, एम. एन. दराडे, निवृत्ती तळपाडे, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष व्ही. पी. सोनवणे, उपाध्यक्ष जे. के. करवर, टी. एस. मेतकर, कार्यवाहक एस. एस. कदम, कोषाध्यक्ष जी. डी. नायकुडी, सदस्य एस. टी. पाखले, डी. व्ही. चव्हाण, पी. ई. परदेशी, बी. के. इलग, एस. एस. भालेराव, वर्षा चौधरी, दत्तू साबळे, अवधूत खाडगीर, सिद्धार्थ सपकाळे, विवेक आहेर, विजय सहाणे, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.