इगतपुरीनामा न्यूज, दि. 7
नाशिकरोड शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी फोनद्वारे माहिती कळविले की, पायधुनी पोलीस स्टेशन मुंबई येथील गुन्हा रजिस्टर नंबर 921/022 भादवि 408 मधील संदीप शर्मा वय 32 हा संशयित इसम पनवेल गोरखपुर एक्सप्रेसने पैसे घेऊन पळून जात आहे. अशी माहिती मिळाल्याने इगतपुरी रेल्वे पोलिसांनी स्वतः स्टाफसह ही गाडी तपासली. परंतु कालावधी कमी असल्याने स्टेशन ड्युटीवरील ASI सोनवणे व PC/ 459 योगेश पाटील यांना नाशिकरोड पर्यंत ह्या गाडीमध्ये संदीप शर्मा ह्या इसमाचा शोध घेण्यास सूचना व मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे संशयित इसमाच्या फोटोवरून योगेश पाटील यांनी इगतपुरी ते नाशिकरोड दरम्यान संदीप शर्मा ह्या संशयित इसमाचा शोध घेऊन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलीस स्टेशनचे श्री. पाटील व पायधुनी पोलीस स्टेशनचे तपास पथक यांच्या ताब्यात त्या आरोपीला देण्यात आले. ह्या आरोपीच्या अंगझडतीमध्ये एकूण 28 लाख रुपये मिळाले असून ते तपास पथकाकडून जप्त करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही कामगिरी इगतपुरी रेल्वे पोलीस स्टेशन कडील पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनी उत्कृष्टपणे केलेली आहे.