आमदार हिरामण खोसकर यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह ; तालुक्यात आज 42 कोरोनामुक्त तर फक्त 32 जण बाधित

इगतपुरीनामा न्यूज, दि. 16
इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी घाबरून न जाता चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान संपूर्ण इगतपुरी तालुक्यात आज फक्त 32 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. आज 42 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. इगतपुरी तालुक्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत इगतपुरी तालुक्यात 276 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अजूनही नागरिकांनी शिस्तीचे पालन करून कोरोना लढा लढण्यासाठी साहाय्य करावे असे आवाहन इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.
आज अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची तालुक्याच्या विविध भागात गर्दीची झुंबड दिसून आली. कोरोना चाचण्या मर्यादित संख्येत होत असून त्यामध्ये वाढ करावी. प्रमुख गावांमध्ये कोरोना चाचणी करणारी यंत्रणा सक्रिय करावी. कोरोना चाचण्यांसाठी ठेवलेले वेळेचे बंधन वाढवावे अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. कोरोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या गावांमध्ये प्राथमिक शाळा किंवा अन्य इमारती अधिग्रहण करून क्वारंटाईन सेंटर उभारावे अशीही मागणी करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसचा ( Covid-19 ) संसर्ग झाला आहे की नाही ? हे तपासून पाहण्यासाठी रक्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही. कोरोना लक्षणग्रस्त व्यक्तीचे घशातील स्त्रावाचे नमुने आणि नाकातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही ? हे ठरवलं जातं. अन्यथा, रुग्णाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहणं आवश्यक आहे. ह्या आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7057235819 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.