इगतपुरीनामा न्यूज, दि. 16
इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील नियंत्रण सुटण्याच्या अवस्थेतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर पाच दिवस कडक जनता कर्फ्यु राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इगतपुरीच्या नगरपरिषद कार्यालयात इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक दीपक पाटील, मुख्याधिकारी निर्मला पेखळे, शहरातील व्यापारी आदींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक संपन्न झाली. इगतपुरी शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील दवाखाने व मेडिकल सेवा वगळून सर्व दुकाने व व्यापारी आस्थापना 20 ते 25 एप्रिल बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दूध विक्री करणाऱ्यांना सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 6 ते 8 ही वेळ देण्यात आली आहे. नगरपरिषदेने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेमार्फत जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे! 7038394724