शब्दांकन : माधुरी केवळराव पाटील
प्राथमिक शिक्षिका, मोडाळे
ता. इगतपुरी, जि. नाशिक
आपण सर्वच शिवरायांच्या जन्मभूमीत जन्मलो आहोत. शिवाजी महाराजांनी एक एक गड किल्ले जिंकून उभा केलेला हा महाराष्ट्र आहे. तेव्हा खूप मेहनतीने उभे असलेले आपले राज्य व आपला भारत देश इतक्या सहजासहजी खचनार नाही. शिवरायांचे मावळे आहोत आम्ही तेव्हा “कोरोना महामारी” ही लढाई नक्कीच जिंकणार. माझ्या देशाला आणि राज्याला नक्कीच वाचवणार.
२०२० हे वर्ष इतके भयंकर असेल असे कुणाच्या मनी व स्वप्नीही नव्हते. याच वर्षात संपूर्ण जगावर कोरोनाने थैमान घातले. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. पण २०२१ या वर्षात आपण आधीच खूप काही शिकलो आहोत. की कोरोनावर मात कशी करायची ते. तेव्हा न घाबरता आपण सारे मिळून या आलेल्या “कोरोनाला”, “कोरोना संकटाला” खंबीरपणे तोंड देण्यासाठी एकवटून उभे राहूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपण सरकारचे जे नियम आहेत त्याचा विचार करू. सर्व नियमांचे उल्लंघन न करता पालन करू आणि एकजुटीने या आजारावर मात करु.
वर्षभर आपण बघत आहोत की बरेच जण कोरोना मूळे मरत आहेत. अरे पण बाकी आजार गेले कुठे ? रोज वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी त्रस्त असलेले पेशंट आता दिसतचं नाही. पण याचे कारण कुणी शोधले ? यावर कधी विचार केला ? याचे कारण एकच की आपली सारी जनता “कोरोना” या विचाराने इतकी भयभीत झाली की मला कोरोना झाला या धक्याने सुद्धा जीवाशी गेली व जात आहे. कोरोना हेच एक कारण नसून अनेक आजार असू शकतात ज्याने अनेकांचे बळी जात आहेत.
या आधीही आपल्या या राज्यात, देशात अनेक मोठं मोठी संकटे आली पण आपल्या, देशातील, राज्यातील जनतेने न घाबरता धैर्याने प्रत्येकावर मात करून नेहमी जय मिळविला आहे. सामर्थ्याने सामना केलेला आहे आणि आता ही आम्ही सारे मिळून सरकारच्या सोबत राहून नक्कीचं “कोरोना महामारी” ही लढाई जिंकणारच आहोत.
“एकीचे बळ” ही गोष्ट आपण जाणून आहोत. जेव्हा एखादे संकट समोर येऊन उभे राहते तेव्हा एकट्याने त्यावर मात करणे कठीण असते.पण जर सारे मिळून त्या संकटाला सामोरे गेले तर ते महाभयंकर संकट आपण सहजपणे निवारू शकतो जिंकू शकतो, त्यावर ही मात करू शकतो. आणि तेच आपण आता देखील करणार आहोत. किंबहुना करावेच लागेल. आणि त्यासाठीच आपल्याला सर्वाना मिळून “कोरोना लढाई” जिंकण्यासाठी सरकारला साथ द्यायचीचं आहे.
विनाकारण विषाची परीक्षा घेऊन आपले अनमोल जीवन धोक्यात घालण्यापेक्षा आपण एकच विचार करू की अजून थोडे दिवस घरात थांबून आपली, आपल्या कुटुंबाची,आपल्या राज्याची व आपल्या देशाची, देशातील जनतेची काळजी घेऊ या. जीव जर वाचला तर सगळे परत मिळवता येईल पण जीवच जर संपला तर सगळेच मार्ग बंद होतील. घरातील एक व्यक्ती गेली तरी सारे ठप्प होऊन बसते हे अनेकांनी अनुभवले व बघितले आहे.
तेव्हा बघा खालील गोष्टींमुळे तरी आपले व इतरांचे प्राण वाचण्यासाठी नक्कीच याची मदत होईल…
१) कोरोना झालेल्या व्यक्तीकडे तुच्छतेने, न बघता व तिरस्कार न करता त्याचा आदर करू, त्याला धीर देऊ या.
२) कोरोनामूळे निधन झाले ही पोस्ट न देता कोरोनामुळे बरे होऊन घरी सुखरूप परत आले ही पोस्ट करूया.
३) सारख्या सारख्या निधनाच्या पोस्ट, बातम्या पहिल्या, वाचल्यामुळे आपली मानसिकता बदलते आपण तोच विचार करतो व साहजिकच त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. तेव्हा हे टाळा.
४) जर आपले नातेवाईक, मित्रपरिवार हॉस्पिटलमध्ये दाखल असतील तर त्यांना फोन करून धीर देण्यासाठी सकारात्मक बाबी बोला. त्याने रुग्ण अर्धा बरा होतो.
५) आपण समोरच्याला दोन चांगल्या गोष्टी सांगितल्याने रुग्णांची मानसिकता बदलून शरीरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते.
५) सारखे नकारात्मक विचार ऐकल्याने किंवा बोलण्याने रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व शरीर निगेटिव्ह बनत जाते.
६) जे गेले दीड वर्ष आपली काळजी घेत आहेत असे कोरोना योद्धा ज्यात डॉक्टर, नर्स, पोलीस यंत्रणा, सफाई कामगार, सरकार यांचे आभार मानून त्यावर पोस्ट करा.
७) विनाकारण कोणत्याही यंत्रणेला किंवा सरकार व प्रशासनाला दोष देण्यापेक्षा सगळे मिळून त्यांना सहकार्य करूया.
८) “कोरोना” वर मात करून ही लढाई आपण सर्वच नक्कीचं जिंकू ही तयारी ठेऊ या.
९) यासाठी एकट्याने विचार करून चालणार नाही तर सर्वच मिळून शासन नियमांचे पालन करू व आपले अनमोल जीवन वाचवू या.
१०) “कोरोना” नक्कीचं व लवकरच पूर्णपणे जाणार आणि आपले राज्य देश पुन्हा एकदा सुरळीत होणार ही खात्री बाळगू या.
सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. यातून आपली सर्वांची नक्कीच लवकरात लवकर सुटका होणार व आपण सर्वच पूर्ववत होणार.
आज नंतर फक्त सकारात्मक विचार करून समोरच्याला धीर देऊन त्याची युनिट पॉवर वाढवू ..
“घरात थांबा व कोरोना वर मात करा..” ही लढाई त्याची, माझी, तुझी नसून सर्वांचीचं आहे. म्हणून आपण सर्व मिळून सरकारला पाठिंबा देऊ व कोरोनावर नक्कीच जय मिळवू.
मी सर्व जनतेला एक आव्हान करू इच्छिते की कोरोना पहिली लाट आली, दुसरी लाट आली, तिसरी लाट येणार येऊ द्या. पण तरीही यावर आपण सारेच मिळून एकजुटीने न घाबरता लढा देऊया आणि आपल्यासह, आपल्या देशाला, आपल्या राज्याला व आणि कुटुंबाला सुरक्षित ठेऊ या. त्यासाठी सगळ्यांनी कोरोना लस घ्या व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. लस घेतल्या नंतर कोणताही त्रास होत नाही तेव्हा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका..स्वस्थ राहा मस्त राहा..काळजी घ्या. माझे नाही तर “आपले कुटुंब आपली जबाबदारी” ही बोलण्याची पुन्हा वेळ आली.
3 Comments