
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – इगतपुरी तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्धल बेताल वक्तव्य करून बहुजन समाजाचा अपमान केला आहे. याचा तीव्र निषेध म्हणून आज समता परिषद इगतपुरी तालुक्याच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांनी विविध घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. यावेळी समता परिषद तालुकाध्यक्ष शिवा काळे, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत दळवी, इगतपुरी शहराध्यक्ष सिद्धार्थ भामरे, घोटी शहराध्यक्ष सुभाष जाखेरे, अनिस पानसरे, संजय जाधव, प्रमोद साळवे, कैलास माळी, राजू पगारे, प्रवीण दिलेकर, गजेंद्र बर्वे, महेश शिरसाठ, प्रल्हाद गायकवाड, शरद वायदंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.