घोटी खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासासाठी आम्ही कटीबद्ध – सरपंच ताई बिन्नर : कोकणेवाडी येथील ग्रामसभेत सर्वानुमते विविध ठराव मंजूर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथील कोकणेवाडी येथे सोमवारी ग्रामसभा पार पडली. घोटी खुर्द गावासाठी ७५ हजार व वाड्या वस्तीसाठी १ लाख लिटरचा उंचावरील जलकुंभ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री जलजीवन मिशन योजनेच्या कामात विष्णू गोडसे यांनी विविध फेरबदल करण्याचे सुचवले होते. त्यास सरपंचासह सर्व ग्रामस्थांनी कडाडुन विरोध केला. आपले म्हणणे मान्य न झाल्यामुळे विष्णु गोडसे यांनी ग्रामसेवक यांचु बदली करावी असा ठराव मांडला. परंतु उपस्थित ग्रामस्थांनी त्या ठरावाला कडाडून विरोध केल्याने ठराव बारगला. त्यामुळे विष्णु गोडसे यांनी सभात्याग केला. घोटी खुर्द गाव आणि त्या अंतर्गत असणाऱ्या वाड्यांचा विकासासाठी सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी कार्यरत आहेत. विरोधासाठी काही ठराविक व्यक्ती समज गैरसमज पसरवत असतात. मात्र आमचा अजेंडा विकासाचा असून त्या व्रताचे तंतोतंत पालन करू अशी माहिती घोटी खुर्दच्या सरपंच ताई बिन्नर यांनी दिली.

ह्या ग्रामसभेमध्ये आलेल्या अर्जांचे वाचन करून त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. आमचा गाव आमचा विकास आराखडा ( जी. पी., डी. पी. ) तयार करण्यात येऊन त्यालाही मंजुरी देण्यात आली. ऐनवेळी आलेल्या विषयांपैकी मुख्यमंत्री जलजीवन मिशन योजनेच्या अंदाजपत्रकात फेरबदल करण्याची चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांच्या सुचनेनुसार पाण्याचे उंचावरील २ जलकुंभ बांधण्याचे अंदाजपत्रकात नमुद करण्याचा ठराव पारित करण्यात आला. ग्रामसभाप्रसंगी सरपंच ताई बिन्नर, ग्रामपंचायत सदस्य मनिषा निसरड, निकिता लोहरे ग्रामस्थ सुरेश रोंगटे, नाना डमाळे, सतीश फोकणे, शांताराम कोकणे, एकनाथ म्हसळे, शिवाजी कोकणे, बळवंत रोंगटे, रुंजा फोकणे, रघुनाथ कोकणे, उत्तम बिन्नर, त्र्यंबक बिन्नर, ज्ञानेश्वर लोहरे, रामदास लोहरे, निवॄत्ती लोहरे, जनार्दन निसरड यासह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!