प्रसूतीपूर्व काळात महिलांची काळजी घेतल्यास अनेक आजार आणि कुपोषण थांबण्यास मदत होईल – वंदना सोनवणे : इगतपुरी बालविकास प्रकल्पातर्फे पर्यवेक्षिकांचे प्रशिक्षण संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

गर्भारपण आणि प्रसूती ह्या सर्व अवस्था महिलांसह जन्माला येणाऱ्या बाळांसाठी महत्वाच्या असतात. यासाठी प्रसुतीपूर्व तयारी केल्यास निरोगी बालके जन्म घेतील. दवाखान्यासह घरी होणाऱ्या प्रसूती निर्धोक झाल्यास महिलांचे आजार, बालकांचे आजार, कुपोषण रोखवण्यासाठी चांगली मदत होते असे मार्गदर्शन इगतपुरीच्या सहाय्यक बालविकास प्रकल्पाधिकारी वंदना सोनवणे यांनी केले. इगतपुरी पंचायत समितीमध्ये एकात्मिक बालविकास प्रकल्पातील पर्यवेक्षिकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. गरोदरपणात काळजी घेतल्यास जन्मणारे बाळ चांगल्या वजनाचे, अव्यंग व निरोगी जन्माला येईल. बाळंतपण, बाळाचे संगोपन इत्यादींसंबंधी महिलांना अंगणवाडी सेविकांमार्फत आवश्यक ती माहिती देऊन त्या दृष्टीने आईची तयारी करणे आवश्यक आहे असेही वंदना सोनवणे यांनी सांगितले.

प्रसूतीपूर्व तयारी, घरी व दवाखान्यात होणाऱ्या प्रसूतीसाठी इगतपुरी प्रकल्पातर्फे बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण संपन्न झाले. सहाय्यक बालविकास प्रकल्पाधिकारी वंदना सोनवणे यांनी सर्व पर्यवेक्षिकांना मोड्युल क्रमांक २० बाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी विविध शंका आणि समस्यांचे समाधान करण्यात आले. ह्या प्रशिक्षणात पर्यवेक्षिका ज्योती काळे, हर्षदा कुवर, ललिता चौधरी, पूर्वा दातरंगे, नीलम बांबळे, सुखदा पाराशरे, अलका खांदवे, चित्रा कुलट, मंगला जडे, वैशाली सोनवणे, विस्ताराधिकारी संजय मोरे आदींनी सहभाग घेतला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!