
इगतपुरीनामा न्यूज, दि. 22
इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नगर परिषदेच्या तलावात मेलेले तरस आढळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या चार दिवसांपासून तलावात तरस पडले असल्याचा लोकांचा कयास आहे. या प्रकारामुळे इगतपुरी नगर परिषदेचा गलथान कारभार चव्हाट्यावर चव्हाट्यावर आला आहे. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर नगरपरिषदेचे जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी राहत असूनही मेलेले तरस आढळले. याच तलावातील पाण्याचा नागरिकांच्या पिण्यासाठी वापर होत असल्याने नागरिकांचा संताप जास्तच वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे. तरस मेल्याची घटना उघडकीस येऊनही वनविभागाला कळवण्याची अथवा त्याला बाहेर काढण्याची तसदीही घेतली नाही असा आरोप करण्यात आला आहे. फिरायला जाणाऱ्या नागरिकांमुळे ही घटना उघडकीस आली आहे.