इगतपुरीनामा न्यूज, दि. 19
साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारी संस्था साहित्यिकांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या संस्थेचे समाजातील विविध स्तरांमधून नेहमीच कौतुक होत असते. संस्थेची स्थापना झाल्यापासून अतिशय कमी वेळात उत्तम प्रकारचे कार्य या संस्थेच्या वतीने पहायला मिळत आहे. विविध स्पर्धा, मार्गदर्शन शिबीरे अशा उपक्रमांच्या माध्यमातून ही संस्था महाराष्ट्रभर आपला विस्तार करीत आहे. या संस्थेने साहित्य क्षेत्रात कमी वेळात ठसा उमटवला आहे. साहित्य क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. मंचाचे प्रथम ऑनलाईन जागतिक कविसंमेलन उत्साहात पार पडले. जगभरातून कवींनी सहभाग नोंदवला. सामाजिक व संवेदनशील काव्याचे सादरीकरण झाले. प्रत्येक कवींच्या सादरीकरणास उत्तम प्रतिसाद लाभला. जागतिक काव्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष लेखक, व्याख्याते विनोद नाठे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी संस्कृती व अंधश्रद्धा यातील अंतर पटवून दिले. त्यांच्या मनोगतातून स्त्री मातेचा आदर तिचं महत्व सांगून त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
प्रमुख उपस्थित सुशीलकुमार पवार यांनी बाप या काव्यातून उत्तम मार्गदर्शन केले. तरुणांनी राजकारणात यावे व या देशाच्या विकासाची धुरा सांभाळावी अन्यथा अंगठे बहाद्दर या देशाला फसवतील असे समाजभान मार्गदर्शन केले. तसेच अभिनेत्री शीतल आदमाने यांनीही स्त्री या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. या कविसंमेलनात तनुजा प्रधान, अमेरिका, अंजली सामंत, न्यूयॉर्क, डॉ. सिमा इंगोर्ले, मलेशिया, साधना कपाळे, दुबई, संगीता महाजन, भारत, रुपाली मोरे, भारत. स्मिता सुहास भीमनवार, सिंगापूर नलिनी कापरे, बोस्टन या जगभरातील कवींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालनाची जबाबदारी महिलाध्यक्षा चैताली कापसे यांनी सांभाळली. कार्याध्यक्षा शिल्पा मुसळे यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता केली. भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे उपाध्यक्ष विजय विष्णू जायभाये यांनी जगभरातील निमंत्रित कवींना एकत्रित संमेलनात जोडण्यात मोलाचा वाटा होता. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल नामदेव सिरसट, सचिव सुमंत पाटील, कोषाध्यक्षा छाया देसले व सचिव ओंकार मेहेर यांनी समाजभान जपत मनोगत व्यक्त केले. या जागतिक काव्यसंमेलनाला उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला.