राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर : शिक्षक ध्येयतर्फे राज्यातील २० विद्यार्थ्यांना पारितोषिक

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४

शिक्षक ध्येयतर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२२ ह्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुंदर, सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता. राज्यातील विद्यार्थ्यांमधून दोन गटात ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. आज बालदिनानिमित्त निकाल जाहीर करण्यात आला. अ आणि ब गटातील २० उत्कृष्ठ चित्रांना सन्मानचिन्ह आणि प्रिंट प्रशस्तीपत्र, शिक्षक ध्येय ची प्रिंट मासिके कुरिअरद्वारे घरपोच दिले जाणार असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. चांदवड तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव येथील कला शिक्षक देविदास हिरे आणि सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, सोड्डी येथील शिक्षक अमित भोरकडे यांनी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. सर्व विजेत्यांचे शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार आणि संपादकीय मंडळाने अभिनंदन केले आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांचे परिसरात कौतुक होत आहे.

पहिली ते पाचवी ह्या अ गटाचे विजेते – पर्व निखील मर्चंट इयत्ता १ ली, मुंबई, ऋग्वेद विवेक घाडी इयत्ता १ ली, मुंबई, सार्थक मकरंद चव्हाण इयत्ता २ री, रत्नागिरी, आदिश संदीप पाटील इयत्ता २ री, कोल्हापूर, शिरीष गजानन काळबांडे इयत्ता ३ री, यवतमाळ, आराध्य रितेश सुर्यवंशी इयत्ता ३ री, धुळे, भविष्या उदय कुदळे इयत्ता ४ थी, नाशिक, रुधांशु अमोल दुधे इयत्ता ४ थी, पुणे, वैष्णवी अनिल भोजरे इयत्ता ५ वी, यवतमाळ, वेदा दत्तगुरू कांबळी इयत्ता ५ वी, सिंधुदुर्ग आहेत. इयत्ता सहावी ते दहावी ब गट विजेते – संस्कार राजेश नेतकर इयत्ता ६ वी, पुणे, मंथन योगेश राऊत इयत्ता ६ वी, मुंबई, प्रिया प्रदीप देसाई इयत्ता ७ वी, सिंधुदुर्ग, शशांक समीर मिंडे इयत्ता ७ वी, रायगड, व्यंकटेश सैदू चव्हाण इयत्ता ८ वी, ठाणे, गौरंगी तुकाराम चव्हाण इयत्ता ८ वी, पुणे, साक्षी लक्ष्मण गायकवाड इयत्ता ९ वी, पुणे, आदित्य किशोर पवार इयत्ता ९ वी, रायगड, दिया दत्ताराम परब इयत्ता १० वी, मुंबई, श्रद्धा राजेंद्र साबळे इयत्ता १० वी, औरंगाबाद हे विजेते जाहीर करण्यात आले आहेत. यात नंबर दिलेला नसून सर्व उत्कृष्ठ असून सर्वांनाच प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!