शिव-विचार प्रतिष्ठानच्या प्रा. सोनाली म्हरसाळे यांचे सेट परीक्षेत यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. 15

नुकतेच झालेल्या सेट परीक्षेत शिव-विचार प्रतिष्ठानच्या प्रा. सोनाली भास्कर म्हरसाळे या उत्तीर्ण झाल्या आहेत. इंग्रजी विषय घेऊन त्यांनी स्वयंअध्ययन करून परिश्रम घेतल्याने त्यांना यश मिळाले. ह्या परीक्षेत 61 हजारांपैकी फक्त 4 हजार विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकालाची टक्केवारी फक्त 6.7 टक्के आहे. प्रा. सोनाली म्हरसाळे ह्या उत्कृष्ट गायिका, सुत्रसंचालिका आणि कवयित्री आहेत. जेष्ठ साहित्यिक डॉ. भास्कर म्हरसाळे यांच्या त्या सुकन्या आहेत. त्यांच्या यशाबाबत शिव-विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस, सहकार सेलचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. पगारे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक संस्थांनी प्रा. सोनाली म्हरसाळे यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.