सावध व्हा रे….सावध व्हा रे…!

कवयित्री : ज्योती देवरे, तहसीलदार पारनेर

किती परिक्षा कठिण देवा
सगळ्या वाटा अंधाराच्या
कशी जीवांना द्यावी हिंमत
दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या

कुठे मिळावा बेड पडाया
कशा गिळाव्या कडु गोळ्या या
कुठून शोधावे रेमडिसिव्हर
आॅक्सिजनही लागला सराया

कोण सरतंय कोण उरतंय
कुठेच हिशेब लागत नाही
सरणावरती जळती प्रेते
तिथेही नंबर लागत नाही

सगळे  मिळुनी लढवत होतो
गेलो झेलून पहिल्या लाटा
कसे गाठले खिंडीत पुन्हा
अवेळच्या या वादळवाटा

भयाण झाले आभाळ सारे
सगळे लपले चंद्र तारे
निसर्ग देतो जणू इशारे
सावध व्हा रे ..। सावध व्हा रे

कवयित्री परिचय

कवयित्री ज्योती देवरे ह्या पारनेर जि. अहमदनगर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्या राज्यभर परिचित आहेत. पारनेर तालुक्यात त्यांचे प्रचंड मोठे काम आहे. संवेदनशिलतेने कामकाज करतांना प्रसंगी वेषांतर करून सुद्धा त्यांनी अनेक प्रकरणे हाताळली आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या प्रश्न समजून घेत सोडवणूक करतात. इगतपुरी त्र्यंबकेश्वर प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून काम करतांना त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरलेली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!