घोटी टोलनाक्याजवळ लाखोंचा गांजा जप्त : २ संशयित अटक ; घोटी पोलीसांची कारवाई

इगतपुरीनामा न्यूज, दि. 10

घोटी पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व पोलीस पथकाने कामगिरी केली आहे. घोटी टोल नाक्याजवळ खंडोबा हॉटेल समोर गाडीची झडती घेतली असता ४ लाख ३० रुपये किमतीचे वेगवेगळे गांजा सदृष्य अंमली पदार्थ विना परवाना आढळुन आले. पोलिसांनी २ संशयित आरोपींना ताब्यात घेऊन १० लाखांची महिंद्रा एक्सयुव्ही कार जप्त केली आहे.

अधिक माहिती अशी की, बुधवारी सायंकाळच्या सुमारास घोटी टोल नाक्याजवळ हॉटेल खंडोबा समोर महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही गाडी नं. एमएच 04 केडब्लु 8949 या गाडीची झडती घेतली. त्यात विमल पान मसाला नावाच्या पिशवीत खाकी प्लास्टीक चिकटटेप पॅकिंग केलेले उग्र वासाचे गांजा सदृष्य पदार्थाचे दोन पुडे व मिलाप नावाच्या काळ्या व खाकी रंगाच्या पिशवीत खाकी प्लास्टीक चिकटटेप पॅकिंग केलेले उग्र वासाचा गांजा सदृष्य पदार्थाचा एक पुडा असे एकुण वजन १९ किलो ४७४ ग्रॅम मादक पदार्थ गांजा असा ३ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदेशीररित्या स्वताचे कब्जात बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करीत असताना आढळुन आला. याप्रकरणी संदेश बबन भोईर, वय ३५, रा. जिजामाता नगर, वाशिंद, ता. शहापुर, जि. ठाणे व चालक अक्षय रमेश रेलेकर, वय २७, रा. ड्रिमलॅन्ड पार्क, वाशिंद, जि. ठाणे यांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस नाईक प्रसाद दराडे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी यांच्यावर गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 (ब) प्रमाणे घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींकडुन ३ लाख ८० हजार रुपये किमतीचे गांजा सदृश अमली पदार्थ व ५० हजार रुपये किमतीचे सॅमसंग व ओपो कंपनीचे दोन मोबाईल असा ४ लाख ३० हजार रुपये व १० लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही गाडी अशी एकुण १४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास, उपनिरीक्षक संजय कवडे, पोलीस हवा. प्रसाद दराडे, शितल गायकवाड, विक्रम झाल्टे, योगेश यंदे आदी करत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!