इगतपुरीनामा न्यूज, दि. 6
इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सद्रोद्धीन येथून भिवंडी येथे कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणारा टेम्पो इगतपुरी पोलिसांनी पकडून 18 जनावरांची सुटका केली आहे. तळेगाव फाटा येथून हे टाटा टेम्पो वाहन जप्त करून 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमानुसार हा गुन्हा दाखल केला असून याबाबतचा पुढील तपास इगतपुरी पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
जावेद मोहम्मद नबी शेख वय 29, इस्माईल इब्राहिम शेख वय 24 दोघे रा. भिवंडी, फकरूद्धीन चांद पठाण वय 30 रा. पिंप्री सद्रोद्धीन ह्या संशयित आरोपी यांनी संगनमत करून महाराष्ट्र राज्यात कत्तलीसाठी प्रतिबंध असणारे गोवंश जनावरांना पिंप्री सद्रोद्धीन येथून घेतले. टाटा टेम्पो क्रमांक एमएच 04 जीआर 4921 मध्ये निर्दयीपणाने दाटीवाटीने कोंबून भिवंडी येथील दोघा आरोपीच्या कत्तलखान्यात कत्तलीसाठी वाहतूक करतांना पोलिसांना आढळून आले. म्हणून इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु झाल्याचे सांगण्यात आले.