इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
आदिवासी विकास विभागाचा नाशिक प्रकल्पांतर्गत कोकमठाण येथील निवासी आश्रमशाळेत अनेक आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ह्या विद्यार्थ्यांना सध्याच्या वसतीगृहातुन शाळा परिसराच्या बाहेर एक किमीवरील वसतिगृहात स्थलांतर करण्यात येत असल्याबाबत त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र भोये, युवा नेते मिथुन राऊत यांना पालकांनी सांगितले. त्यांनी तातडीने आदिवासी विकास विभागात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने हे स्थलांतर रोखावे अशी आग्रही मागणी केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी संबंधित शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांचे अन्यत्र स्थलांतर करू नये अशा सूचना दिल्याने हा प्रश्न सुटला आहे. यामुळे पालकांनी रवींद्र भोये, मिथुन राऊत यांचे आभार व्यक्त केले आहेत. आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक अप्पर आयुक्त सूदर्शन नगरे यांनी याबाबत योग्य ती चौकशी करून निर्णय घेऊ असे सांगितले.