शनिवारी नाशिकमध्ये होणार २३ वे ग्रामीण साहित्य संमेलन : सहा सत्रातील विविध कार्यक्रमांची मिळणार मेजवानी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 2

इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे २३ वे ग्रामीण साहित्य संमेलन ५ व ६ नोव्हेंबरला नाशिक येथे होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली आहे. हे दोन दिवसीय साहित्य संमेलन नाशिक येथील मानवधन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या पाथर्डी फाटा येथील शैक्षणिक प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या संमेलनाचे अध्यक्षस्थान जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे हे भूषवणार असून संमेलनाचे उद्घाटक म्हणून प्रा. लक्ष्मण महाडिक असणार आहे. हे दोन दिवसीय साहित्य संमेलन सहा सत्रात संपन्न होणार आहे.

ग्रंथ दिंडी, उद्घाटन सोहळा, निमंत्रितांचे कवी संमेलन, व्याख्यान, परिसंवाद, पुरस्कार वितरण, कथा कथन, खुले कवी संमेलन असा भरगच्च कार्यकम होणार आहे. सहित्यिकांनी या साहित्य संमेलनात अवश्य सहभागी व्हावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. या अगोदर इगतपुरी तालुका साहित्य मंडळाने २२ ग्रामीण साहित्य संमेलन इगतपुरी तालुक्यातील विविध भागात भरवून अनेक नव साहित्यिकांना प्रेरणा देणारे ठरले आहे. यातून प्रेरणा घेवून अनेक साहित्यिक महाराष्ट्रात साहित्याची परंपरा जोपासत आहे. या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील अनेक मान्यवर साहित्यिकांचा सहभाग असतो. याप्रसंगी स्वागताध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, मंडळाचे विश्वस्त ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, ग्रंथमित्र बाळासाहेब पलटणे, मानवधन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, लेखक दत्तात्रय झनकर, हिरामण शिंदे, रवींद्र पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!