इगतपुरीनामा न्यूज, दि. 28
गोरगरीब वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून निर्मळ आनंद मिळवण्यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. म्हणून अक्षय कटारिया स्मृती फाऊंडेशनतर्फे विकासापासून दूर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर येथील गरीब आदिवासी 216 कुटुंबांना दीपावली निमित्त मिठाई, साड्या, उबदार ब्लँकेट वाटप करून आदिवासी बांधवांची दीपावली गोड आणि उबदार केली. फाऊंडेशनतर्फे दहा वर्षांपासून गोरगरीबांना भेटवस्तू देऊन खरी आत्मिक समाधानाची दीपावली साजरी केली जाते.
या कार्यक्रमासाठी संजय कटारिया, श्रृती कटारिया, वास्तुविशारद प्रेरणा कटारिया आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी नारायण ठोंबरे, अशोक ठोंबरे, अविनाश ठोंबरे, अमोल ठोंबरे, भगवान ठोंबरे, शिक्षक राजेंद्र ठोंबरे, छाया ठोंबरे, मीना ठोंबरे, चंद्रभागा ठोंबरे, संदीप ठोंबरे, निलम ठोंबरे, कु. दामिनी, कु. अनिकेत, कु.आविष्कार, कु. पारितोष, कु. ओम, कु. यश, प्रशांत कारवारे, शिक्षक सुदर्शन केदार आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शिक्षक भगवान भामरे यांनी तर आभार राजेंद्र ठोंबरे यांनी मानले.