इगतपुरीनामा न्यूज, दि. 21
मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्यांनी गोरख बोडके यांच्या वतीने गोरगरीब कुटुंबात दिवाळीसाठी कपडे, फराळ आदी साहित्य वाटून दीपोत्सव साजरा करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव ह्या अतिदुर्गम आदिवासी परिसरातील आदिवासी वाडया पाड्यावरील अनेक गोरगरीब कुटुंबाना दिवाळी भेट म्हणून कपडे, मिष्टान्न यांचा संच वितरित करण्यात आला. महिलांना साड्या, मुलांना कपडे आणि फराळाचे साहित्य वाटप कारण्यासाठी मानवधन संस्थेचे प्रकाश कोल्हे यांनी पुढाकार घेऊन काम केले. या कार्यात त्यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी बहुमोल सहाय्य केले.
‘मानवधन’चे प्रकाश कोल्हे हे दरवर्षी दिवाळीपुर्वीच गोरगरीबांची दिवाळी साजरी करण्यासाठी पुढाकार घेतात. यावर्षी कुशेगाव भागातील अनेक कुटुंबाना या उपक्रमाचा लाभ झाला. गरजाऊ कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला वयानुसार कपडे, फराळ, मिष्टान्न असे साहित्य वितरित करण्यात आले. आदिवासी बांधवांची सहकुटुंब दिवाळी साजरी व्हावी या हेतुने हा उपक्रम राबवला जाईल असे प्रकाश कोल्हे म्हणाले. गोरख बोडके म्हणाले की, प्रकाश कोल्हे हे सामाजिक दा्तृत्व असणारे व्यक्तिमत्व असून त्यांनी कुशेगाव भागात आदिवासी कुटूंबाच्या घरात “प्रकाश” निर्माण केला आहे. यावेळी परिसरातील नागरिक हजर होते.