चिंचलेखैरे येथे वन्यजीव सप्ताहात विविध कार्यक्रम : इगतपुरी प्रादेशिक वन विभागाचे यशस्वी आयोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 8

चिंचलेखैरे येथील १ ते ७ ऑक्टोबर पर्यंतच्या वन्यजीव सप्ताहाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला. चिंचलेखैरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव आणि रोहयो नाशिक पश्चिम अनिल पवार, इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह यशस्वी झाला. कार्यक्रमात चित्रकला, वक्तृत्व, निबंध, सांस्कृतिक, कला, कामड नृत्य आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी सरपंच मंगा खडके, प्रभारी केंद्रप्रमुख निवृत्ती तळपाडे, उपसरपंच भाऊ भूरबुडे, पोलीस पाटील श्री. भगत, वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, पोपट डांगे, शैलेश झुटे, सचिन दिवाणे, वनरक्षक फैजअली सय्यद, गौरव गांगुर्डे, सोमनाथ जाधव, सुरेखा गुव्हाडे, मनिषा सोनवणे, रेश्मा पाठक, मालती पाडवी, कावेरी पाटील, मंगला धादवड, स्वाती लोखंडे, राहुल घाटेसाव, कैलास पोटींदे, गोरख बागुल, शरद थोरात, चिंतामण गाडर, विठ्ठल गावंडे, वाहनचालक मुज्जू शेख, महेंद्र वार्ले, वनमजूर काळू आगिवले, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सावंत, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सर्पमित्र प्रवीण भारती, सागर रूपवते यांनी वन्यजीव संरक्षणाबाबत डिजिटल सादरीकरण  केले. त्यांनी विविध सर्पाबाबत माहिती व सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचार यावर मार्गदर्शन केले. मनिषा सोनवणे यांनी मानव वन्यजीव संघर्ष, शरद थोरात यांनी विविध पशुपक्षी, वन्यप्राणी यांची ओळख करून दिली. विजेत्या विद्यार्थ्यांना वन अधिकाऱ्यांनी बक्षीस वितरण केले. सूत्रसंचालन सुरेखा गुव्हाडे यांनी केले. वन्यजीव सप्ताह कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्य करणाऱ्या सर्वांचे यावेळी वन विभागातर्फे वनरक्षक गौरव गांगुर्डे यांनी आभार व्यक्त केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!