
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – इगतपुरी तालुक्यातील कावनई येथुन रायांबे गावाकडे शनिवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याची घटना घडली आहे. मोटार सायकल वरून एक महिला व एक पुरूष अशा दोन अज्ञात व्यक्तीनी ही चोरी केल्याची लेखी तक्रार फुल्याबाई बहिरू धांडे, वय ६७ वर्षे रा. रायांबे ता. इगतपुरी यांनी आज घोटी पोलिसांकडे केली आहे. गळ्यातील मणी मंगळसुत्रे असलेली दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि सोन्याचे डोरले धक्काबुक्की करून धमकावत हिसकावून घेतले. यानंतर ते व्यक्ती कावनई मार्गे पळून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. ग्रामीण भागातही अशा घटना सुरु झाल्याचे ह्या घटनेतून दिसत आहे. महिलांनी मौल्यवान दागिने घालून गर्दी नसलेल्या भागात जाऊ नये. संशयास्पद घटना आढळल्यास पोलीस अथवा स्थानिक नागरिकांची मदत घ्यावी.