
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
वाढदिवसाच्यानिमित्ताने डीजे, ढोल-ताशे, शँपेनवरील वायफळ खर्च हे नित्याचेच आहे. राजकीय पदाधिकारी म्हटले तर आणखीनच वायफळ खर्च होतो. याला इगतपुरी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष लकी गोवर्धने अपवाद ठरले आहेत. त्र्यंबकेश्वर रोडवरील अनाथ आश्रमात जाऊन वाढदिवस साजरा करणारे लकी गोवर्धने यांच्या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्र्यंबकेश्वर येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या अनाथ मुलांचा आधारतीर्थ आश्रमात एलजी ग्रुप, हिंदवी स्वराज्य ग्रुप व काँग्रेस कमिटी इगतपुरी तालुका यांनी इगतपुरी तालुका उपाध्यक्ष लकी गोवर्धने यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता.
यावेळी शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, पेन आदी साहित्य, किराणा, घरगुती तांदुळ, ताजा भाजीपाला, कलिंगड व खाऊ इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक उपक्रम राबवुन आश्रमातील मुलांना आनंद व समाधान वाटेल असा आनंददायी उपक्रम राबवणारा उमदा व्यक्ती आपला वाढदिवस इतक्या स्तुत्य उपक्रमांनी साजरा करतो हे स्तुत्य असल्याचे काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यावेळी म्हणाले. हिंदवी स्वराज्य ग्रुपतर्फे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी याप्रसंगी सांगितले. लकी गोवर्धने यांनी आपली भावना व्यक्त करताना असा वाढदिवसाचा अनुभव मला पहिल्यांदाच आला. यापेक्षा जास्त समाधान कशातच नाही असे भावनिक उदगार काढले.
याप्रसंगी काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी अध्यक्ष पांडुरंग शिंदे, उदय जाधव, गटनेते आकाश दिवटे, हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रुपेश नाठे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, योगेश शेलार, अनिल गोवर्धने, अनिल गोवर्धने, शरद पवार, किरण गोवर्धने, बाळकृष्ण शिरसाठ, राहुल धात्रक, राहुल गायखे, अमोल गोवर्धने, सुनिल खातळे, सचिन गोवर्धने, राहुल गोवर्धने, अंकुश गोवर्धने, उत्तम गोवर्धने, समाधान गोवर्धने, माणिक गोवर्धने, दीपक मुसळे, मोहन बोडके, गणेश नाठे आदी उपस्थित होते.