इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
काँग्रेसच्या नाशिक जिल्हा अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बोर्ली येथील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पंडित यांची नियुक्ती या विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली नाशिक येथे पदाधिकारी बैठकित काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश कहांडोळे यांच्या हस्ते पंडित यांना पत्र देण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा बाळासाहेब कुकडे, प्रभारी उत्तमराव भोसले, जिल्हा चिटणीस देवराम नाठे, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, अरुण गायकर, संतोष सोनवणे, सत्तार मणियार उपस्थित होते. यावेळी पक्षासाठी बूथ बांधणी करत येणाऱ्या काळात गावपातळीवर पक्षाचे धोरण राबविण्याचा मानस पंडीत यांनी बोलून दाखविला. पंडित यांच्या निवडीचे अभिनंदन मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, प्रांतिक सदस्य कचरू शिंदे, जेष्ठ नेते जनार्दन माळी, सविता पंडित, निवृत्ती कातोरे, बाळासाहेब वालझाडे, मनीषा मालुंजकर, दिलीप पाटील, सुदाम भोर, किरण पागेरे, मच्छिंद्र दोंदे, बाळासाहेब लंगडे, ज्ञानेश्वर खातळे, कैलास घारे, योगेश सुरुडे, गणेश कौटे, सचिन तारगे, संतोष जगताप, ज्ञानेश्वर कडू, प्रकाश दालभगत आदींनी केले आहे.