इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत इगतपुरी तालुक्यात २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज फक्त ८ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी वाढत असतांनाच नवीन रुग्णांचे आकडेही कमी होतांना दिसत आहेत. सध्या तालुक्यातल्या विविध कोविड सेंटर्स मध्ये ८१ रुग्ण उपचार घेत असून हा आकडा दोन अंकांवर आल्यामुळे तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान रुग्णसंख्या कमी होत असली तरी सतर्क राहणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी पुन्हा बिनधास्त आणि विनामास्क फिरण्याची घाई करू नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.
मातोश्री हॉस्पिटल, श्रीराम वाडी घोटी येथे Star Health Insurance धारकांसाठी Cashless Facility सुरु झाली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - डॉ. जितेंद्र चोरडिया 9028399899