इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
इगतपुरी तालुक्याची घोडदौड कोरोनामुक्त होण्याकडे होत आहे. लवकरच जिल्ह्याच्या कोरोनामुक्त तालुक्याच्या यादीत इगतपुरीचा समावेश होणार असल्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे तालुक्यात कोरोना लसीकरण कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभत आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे.
आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार इगतपुरी तालुक्यात ४ कोरोना बाधित व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज नव्या २ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. दिवस अखेर आता फक्त १० कोरोना बाधित रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008